एस्तेर 3:1-5
एस्तेर 3:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?” राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते. जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
एस्तेर 3:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?” ते रोज त्याला असे बोलत तरी त्याने त्यांना जुमानले नाही, तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली; आपण यहूदी आहोत असे त्याने त्यांना सांगितले होते. मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.