इफिसकरांस पत्र 6:6-8
इफिसकरांस पत्र 6:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माणसांना खूश करणार्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणार्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा; कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.
इफिसकरांस पत्र 6:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा, ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा, प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.
इफिसकरांस पत्र 6:6-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
केवळ त्यांच्या नजरेसमोर, त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा. ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभुची करतो अशी समजून करा. तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
इफिसकरांस पत्र 6:6-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
केवळ त्यांना खुश करणाऱ्या तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही सेवा केवळ माणसांची नव्हे तर प्रभूची आहे, असे मानून ती उत्साहाने करा. हे लक्षात ठेवा की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तो प्रभूच्या पारितोषिकास पात्र ठरतो.