इफिसकरांस पत्र 4:3-6
इफिसकरांस पत्र 4:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे ‘त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे.’ एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.
इफिसकरांस पत्र 4:3-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा; एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत.
इफिसकरांस पत्र 4:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.
इफिसकरांस पत्र 4:3-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.