इफिसकरांस पत्र 4:25-27
इफिसकरांस पत्र 4:25-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. सैतानाला संधी देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:25-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:25-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:25-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. सैतानाला वाव देऊ नका.


