इफिसकरांस पत्र 2:4-9
इफिसकरांस पत्र 2:4-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.
इफिसकरांस पत्र 2:4-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतिमुळे, आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसवले आहे. यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही.
इफिसकरांस पत्र 2:4-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले; ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.
इफिसकरांस पत्र 2:4-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले. देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.