इफिसकरांस पत्र 1:18-20
इफिसकरांस पत्र 1:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.
इफिसकरांस पत्र 1:18-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे. जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले
इफिसकरांस पत्र 1:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले
इफिसकरांस पत्र 1:18-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपल्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व या गोष्टी, तुम्ही त्याच्या सामर्थ्यशाली पराक्रमाच्या कृतीवरून जाणून घ्याव्यात. देवाने हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि आपल्या उजवीकडे स्वर्गीय जगतात बसविले.