इफिसकरांस पत्र 1:1-3
इफिसकरांस पत्र 1:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
इफिसकरांस पत्र 1:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून, इफिस शहरातील ख्रिस्त येशूंमधील विश्वासू असलेल्या परमेश्वराच्या पवित्र लोकांना, आपले परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो. परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे.
इफिसकरांस पत्र 1:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे
इफिसकरांस पत्र 1:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे.