YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 3:1-13

उपदेशक 3:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो. जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते. ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते. रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते. शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते. धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते. दुसऱ्या लोकांस आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते. गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते. वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते. प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते. काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभ मिळतो? देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे. देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही. त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले. आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे.

सामायिक करा
उपदेशक 3 वाचा

उपदेशक 3:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो : जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो; वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो; रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो; धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय; आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो; शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो; फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय; मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो; प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय; युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.

सामायिक करा
उपदेशक 3 वाचा