अनुवाद 7:6-10
अनुवाद 7:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो. पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
अनुवाद 7:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हांला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता; पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. तेव्हा हे लक्षात घे की, तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो; जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे पारिपत्य करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे पारिपत्य करतो.