YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 32:10-14

अनुवाद 32:10-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते, त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता. त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले; गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.

सामायिक करा
अनुवाद 32 वाचा

अनुवाद 32:10-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले. इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो. परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता. परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले. गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यालात.

सामायिक करा
अनुवाद 32 वाचा