अनुवाद 28:1-6
अनुवाद 28:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील: तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील. तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील. तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल.
अनुवाद 28:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील; तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील.