अनुवाद 20:3-4
अनुवाद 20:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका; कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’
सामायिक करा
अनुवाद 20 वाचाअनुवाद 20:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका. कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.”
सामायिक करा
अनुवाद 20 वाचा