अनुवाद 18:21-22
अनुवाद 18:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
सामायिक करा
अनुवाद 18 वाचाअनुवाद 18:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे’ असा विचार तुझ्या मनात आला, तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.
सामायिक करा
अनुवाद 18 वाचा