YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 18:15-19

अनुवाद 18:15-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे. मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन.

सामायिक करा
अनुवाद 18 वाचा

अनुवाद 18:15-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका; होरेब डोंगराजवळ मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे तू विनंती केली होतीस त्याप्रमाणे होईल; तू म्हणालास, ‘माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.’ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन.

सामायिक करा
अनुवाद 18 वाचा