अनुवाद 15:7-11
अनुवाद 15:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल. तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल. गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
अनुवाद 15:7-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नकोस, किंवा आपला हात आखडू नकोस, तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस; आपल्या दरिद्री बांधवांकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्हाणे केले तर तुला पाप लागेल. तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस; असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.