अनुवाद 11:18-21
अनुवाद 11:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा. आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल.
अनुवाद 11:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील.