YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 3:8-12

दानीएल 3:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता यावेळी काही खास्द्यांनी जवळ येऊन यहूद्यांवर दोषारोप केला. ते नबुखद्नेस्सर राजास म्हणाले, “महाराज चिरायु असा. महाराज तुम्ही असे फर्मान काढले आहे ना, की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे. जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. आता येथे काही यहूदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलाच्या प्रांतात केली, त्यांची नावे शद्रख, मेशख अबेदनगो ही आहेत. हे लोक, राजा, आपली पर्वा करत नाहीत, ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाही, किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत, ज्याची तुम्ही स्थापना केली आहे.”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा

दानीएल 3:8-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यावेळी काही ज्योतिषी राजाकडे गेले व यहूदींवर आरोप लावला. ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू असा! महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी, आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे. परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा

दानीएल 3:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला. ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू व्हा. महाराज, आपण हुकूम केला की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावेत; आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे; पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्या नावांचे कोणी यहूदी आहेत त्यांनी, महाराज, आपली पर्वा केली नाही; ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत.”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा