YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 3:13-15

दानीएल 3:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही? आता जर तुम्ही तयार आहात तर, जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे; पण जर तुम्ही नमन करणार नाही, तर तुम्हास त्वरीत तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा

दानीएल 3:13-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले, नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय? मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा

दानीएल 3:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “अहो शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”

सामायिक करा
दानीएल 3 वाचा