YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 1:12-16

दानीएल 1:12-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे. नंतर आमचे बाहयरुप व त्या तरुणांचे बाहयरुप व जे राजाचे मिष्ठान्न खात आहेत त्या तरुणांचे बाह्यरुप, त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर.” मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला दहा दिवसानी त्याने त्यांची पाहणी केली. दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा

दानीएल 1:12-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्‍या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.” तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले. दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्‍या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा

दानीएल 1:12-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे. नंतर आमची तोंडे पाहा; आणि राजघरचे अन्न खाणार्‍या तरुणांचीही तोंडे पाहा; मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर.” त्याने त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला. दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्‍या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा