प्रेषितांची कृत्ये 8:4-22
प्रेषितांची कृत्ये 8:4-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. आणि त्या नगरात आनंदीआनंद झाला. त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे. लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.” त्याने त्यांना बर्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. तरीपण फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला; आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला. मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले; ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली; कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, “ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.
प्रेषितांची कृत्ये 8:4-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत. फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.” त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत. परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या. स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरूशलेम शहरामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले. पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली. या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले. “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.” पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.” या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.
प्रेषितांची कृत्ये 8:4-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला. फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले. अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत. त्या शहरात मोठा आनंद झाला होता. आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते. ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते. परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला. शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले. ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.” पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला! या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही. तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील
प्रेषितांची कृत्ये 8:4-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. आणि त्या नगरात आनंदीआनंद झाला. त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे. लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.” त्याने त्यांना बर्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. तरीपण फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला; आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला. मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले; ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली; कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, “ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.
प्रेषितांची कृत्ये 8:4-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले. फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले. ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. त्या नगरात आनंदीआनंद झाला. त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणी तरी मोठे आहोत, असे तो दाखवत असे. लहानापासून थोरांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, ‘हा माणूस म्हणजे जिला देवाची महाशक्ती म्हणतात, तिचाच अवतार आहे.’ त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने विस्मित केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले होते. तरी पण देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयी फिलिप शुभवर्तमान घोषित करीत असता लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि अनेक स्त्रीपुरुषांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोननेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्हे व मोठे चमत्कार पाहून तो स्वतः आश्चर्यचकित झाला. शोमरोन येथील लोकांनी देवाचे वचन स्वीकारले आहे, असे यरुशलेममधल्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रेषितांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. नंतर पेत्र व योहान ह्यांनी त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले, “ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो. आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही. तुझ्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करून प्रभूला विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या विचारांची तुला क्षमा मिळेल.