प्रेषितांची कृत्ये 8:38-40
प्रेषितांची कृत्ये 8:38-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली, नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले, आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला.
प्रेषितांची कृत्ये 8:38-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.
प्रेषितांची कृत्ये 8:38-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. इकडे फिलिप्प अजोत नगरात आढळला आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.
प्रेषितांची कृत्ये 8:38-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने रथ उभा करावयास सांगितले. फिलिप व अधिकारी दोघे पाण्यात उतरले. फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पुन्हा पडला नाही, मग तो आपल्या वाटेने आनंदाने निघाला. इकडे फिलिपच्या लक्षात आले की, आपण अजोत नगरात आहोत. पुढे कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने शुभवर्तमान घोषित केले.