प्रेषितांची कृत्ये 8:36-38
प्रेषितांची कृत्ये 8:36-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” (फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.”)2 तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला.
प्रेषितांची कृत्ये 8:36-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते दोघे प्रवास करीत असताना, एका तळ्याजवळ आले; तेव्हा अधिकारी म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे; माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली, नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले, आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला.
प्रेषितांची कृत्ये 8:36-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?” फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.” मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.
प्रेषितांची कृत्ये 8:36-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा तो अधिकारी म्हणाला, “पाहा, इथे तर पाणी आहे. मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” फिलिपने म्हटले, “जर आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरत असाल, तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असा मी विश्वास धरतो.” त्याने रथ उभा करावयास सांगितले. फिलिप व अधिकारी दोघे पाण्यात उतरले. फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला.