YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 8:32-35

प्रेषितांची कृत्ये 8:32-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?” मग फिलिप्पाने तोंड उघडले; व शास्त्रलेखातील यशया संदेष्ट्याच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली.

प्रेषितांची कृत्ये 8:32-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.” षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?” तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.

प्रेषितांची कृत्ये 8:32-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्‍याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.” तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?” तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.

प्रेषितांची कृत्ये 8:32-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो जो धर्मशास्त्रलेख वाचत होता तो असा: त्याला मेंढरासारखे वध करण्यासाठी नेले आणि जसे कोकरू लोकर कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्या दीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही, त्याच्या संततीविषयी कोणी काहीच सांगू शकणार नाही कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपवण्यात आले. अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’ फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले.