YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 8:26-29

प्रेषितांची कृत्ये 8:26-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो. मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरूशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता. पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.”

प्रेषितांची कृत्ये 8:26-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.” तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता, आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”