प्रेषितांची कृत्ये 7:9-10
प्रेषितांची कृत्ये 7:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
प्रेषितांची कृत्ये 7:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
प्रेषितांची कृत्ये 7:9-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्यांच्याबरोबर होते, आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारो याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली.
प्रेषितांची कृत्ये 7:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने सभ्यता व सुज्ञता यांनी संपन्न केले. त्यामुळे त्याने त्याला मिसर देशावर व राजघराण्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले.