प्रेषितांची कृत्ये 7:57-60
प्रेषितांची कृत्ये 7:57-60 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:57-60 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते. ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:57-60 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
प्रेषितांची कृत्ये 7:57-60 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते. ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.