YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 6:3-7

प्रेषितांची कृत्ये 6:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू. म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली.

प्रेषितांची कृत्ये 6:3-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ. आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.” गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले. मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.

प्रेषितांची कृत्ये 6:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.

प्रेषितांची कृत्ये 6:3-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात आदरणीय पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” हा विचार सर्व लोकांना पसंत पडला आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असलेल्या स्तेफनबरोबर फिलिप, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व अंत्युखिया येथील यहुदीमतानुसारी नीकलाव ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.