प्रेषितांची कृत्ये 5:28-29
प्रेषितांची कृत्ये 5:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“या नावाने शिक्षण देऊ नका, असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही, तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे
प्रेषितांची कृत्ये 5:28-29 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.” परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे.
प्रेषितांची कृत्ये 5:28-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.
प्रेषितांची कृत्ये 5:28-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“ह्या नावाने शिकवण देऊ नका, असे आम्ही तुम्हांला बजावले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात!” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.