प्रेषितांची कृत्ये 27:39-40
प्रेषितांची कृत्ये 27:39-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले. म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.
प्रेषितांची कृत्ये 27:39-40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तेथेच ठेवले. सरतेशेवटी जेव्हा तसा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरवले, तेव्हा त्यांनी नांगर कापून टाकून, ते समुद्रात राहू दिले सुकाणूची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्यावर सोडून किनार्याची वाट धरली.
प्रेषितांची कृत्ये 27:39-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हे त्यांनी ओळखले नाही; पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला. मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणाची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्यावर सोडून सपाटीची वाट धरली.
प्रेषितांची कृत्ये 27:39-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला. म्हणून नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणूंची बंधने सैल केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरली.