प्रेषितांची कृत्ये 27:22-26
प्रेषितांची कृत्ये 27:22-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत. तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
प्रेषितांची कृत्ये 27:22-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल. जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’ यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्याने म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार. परंतु आपले जहाज एका बेटावर आदळून फुटणार आहे.”
प्रेषितांची कृत्ये 27:22-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल; कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल.”
प्रेषितांची कृत्ये 27:22-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल; कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल. तथापि आपण एका बेटावर फेकले जाऊ .”