YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 23:16-35

प्रेषितांची कृत्ये 23:16-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.” तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलायचे आहे.” तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?” तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.” तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला. मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा; आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.” शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले : “महाराज फेलिक्स सुभेदार ह्यांना क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम. ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले; आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले. तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले. ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]” शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले; आणि दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला.

प्रेषितांची कृत्ये 23:16-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे. तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे. तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?” तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.” तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.” मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.” आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या. शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले. “महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम. या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले. आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले. तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले. या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.” शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर, त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला.

प्रेषितांची कृत्ये 23:16-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले. तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.” म्हणून त्याला सेनापतीकडे नेले. शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.” तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?” तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत. परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.” तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले. त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव. पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.” मग त्याने असे पत्र लिहिले: महाराज, राज्यपाल फेलिक्स यास: क्लौडियस लुसियाचा: सलाम. या मनुष्याला यहूदी लोकांनी पकडले होते व ते त्याला ठार मारणार होते, तेव्हा तो रोमी नागरिक आहे हे समजल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी मी सैनिक पाठविले. त्यांनी काय दोषारोप केला आहे हे समजून घ्यावयाचे होते म्हणून मी त्याला न्यायसभेपुढे आणले. मला लवकरच समजून आले की त्यांच्यातील वाद हा नियमांविषयी होता आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवास अथवा मरणाची शिक्षा देता येणार नाही. परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला. म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले. दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर पुढे जाण्यास घोडदळाला त्याच्याबरोबर ठेऊन ते आपल्या बराकीत परतले. ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले. राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर, राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्‍यात ठेवण्याचा हुकूम दिला.

प्रेषितांची कृत्ये 23:16-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.” तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलायचे आहे.” तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?” तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.” तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला. मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा; आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.” शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले : “महाराज फेलिक्स सुभेदार ह्यांना क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम. ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले; आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले. तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले. ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]” शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले; आणि दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला.

प्रेषितांची कृत्ये 23:16-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्या कारस्थानाविषयी पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा. ह्याला त्यांना काही सांगावयाचे आहे.” त्याने त्याला सहस्त्राधिपतीकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.” सहस्त्राधिपतीने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?” तो म्हणाला, “यहुदी अधिकाऱ्यांनी असे संगनमत केले आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. तर आपण त्यांचे ऐकू नका कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला ठार मारीपर्यंत ते खाणार पिणार नाहीत. आता ते तयार होऊन आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.” “तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नकोस”, असे त्या तरुणाला बजावून सहस्त्राधिपतीने त्याला निरोप दिला. सहस्त्राधिपतीने त्याच्या दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरिया येथे जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी आज रात्री नऊ वाजता तयार ठेवा. घोडे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सुरक्षित न्या.” नंतर त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले - महाराज फेलिक्स राज्यपाल ह्यांस, क्लौद्य लुसिया ह्याचा नमस्कार, ह्या मनुष्याला यहुदी लोकांनी धरले होते आणि ते त्याचा घात करणार होते, इतक्यात हा रोमन आहे, असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन त्याला सोडवले. ह्याच्यावर आरोप ठेवण्याचे काय कारण होते, हे समजून घेण्याच्या इच्छेने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत नेले. त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टीसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला आढळले. ह्या माणसाविरुद्ध कट रचण्यात आला आहे, अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे. शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्रीच्या वेळी अंतिपत्रीस येथे नेले. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार तयार ठेवून ते गढीत परत आले. कैसरियास गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलला त्याच्यापुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे, असे समजल्यावर त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” नंतर त्याला हेरोदच्या वाड्यात देखरेखीखाली ठेवावे, असा त्याने हुकूम सोडला.