प्रेषितांची कृत्ये 20:23-25
प्रेषितांची कृत्ये 20:23-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.
प्रेषितांची कृत्ये 20:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे. राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे.
प्रेषितांची कृत्ये 20:23-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय. “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही.
प्रेषितांची कृत्ये 20:23-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे. मी तुमच्यामध्ये देवराज्याची घोषणा करत फिरलो, येथून पुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.