प्रेषितांची कृत्ये 20:22-24
प्रेषितांची कृत्ये 20:22-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे.
प्रेषितांची कृत्ये 20:22-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आणि आता, जसे आत्म्याच्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तेथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही. मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.
प्रेषितांची कृत्ये 20:22-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.
प्रेषितांची कृत्ये 20:22-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही. केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.