प्रेषितांची कृत्ये 20:18-21
प्रेषितांची कृत्ये 20:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे. मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली, यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.
प्रेषितांची कृत्ये 20:18-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते आल्यानंतर, त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे. म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभुची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे. जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.
प्रेषितांची कृत्ये 20:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले : “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुमच्याबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे; जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो.
प्रेषितांची कृत्ये 20:18-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून माझा जीवनक्रम कसा होता, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो.