YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 20:1-6

प्रेषितांची कृत्ये 20:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोवसात आमची वाट पाहत राहिले; आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो.

प्रेषितांची कृत्ये 20:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला. त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले. त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया नगराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस शहरात आमची वाट पाहू लागली. बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.

प्रेषितांची कृत्ये 20:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा गडबड शांत झाली, तेव्हा पौलाने शिष्यांना बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर, त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जाण्यास निघाला. त्या भागातून प्रवास करून त्याने लोकांना अनेक उत्तेजनपर शब्द सांगितले आणि शेवटी तो ग्रीसमध्ये आला, तिथे तो तीन महिने राहिला. पुढे सीरियाला जलमार्गाने जाण्याची तो तयारी करीत असताना, यहूदी कट कारस्थान करीत आहेत, हे त्याच्या नजरेस आले, तेव्हा मासेदोनियामधून जाण्याचे त्याने ठरविले. त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते. ते पुढे जाऊन त्रोवास येथे आमची वाट पाहत होते. परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला.

प्रेषितांची कृत्ये 20:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोवसात आमची वाट पाहत राहिले; आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो.

प्रेषितांची कृत्ये 20:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर गलबला शांत झाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो अखया प्रांतात गेला. तेथे तीन महिने राहिल्यावर तो तारवातून सूरिया देशात जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला आहे, हे कळता त्याने मासेदोनियातूनच परत जाण्याचा बेत केला. बिरुया येथला पुर्राचा मुलगा सोपत्र तसेच थेस्सलनीकर अरिस्तार्ख, सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य, आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोवस येथे आमची वाट पाहत राहिले. बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही एक आठवडा राहिलो.