YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 19:8-12

प्रेषितांची कृत्ये 19:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली. हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले. देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

प्रेषितांची कृत्ये 19:8-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला. परंतु काहीजण हटवादी झाले; व त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला. असे दोन वर्षे ते सातत्याने करीत राहिले. त्यामुळे आशिया प्रांतात राहणार्‍या सर्व यहूदी व गैरयहूदी लोकांनी प्रभुचे वचन ऐकले. परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली, त्यामुळे असे झाले की, ज्या रुमालांना आणि अंगावरच्या कपड्यांना पौलाचा फक्त स्पर्श झाला होता, ते रुमाल व कपडे आजार्‍यांकडे घेऊन गेले आणि त्यांचे आजार बरे झाले आणि दुरात्मे त्यांना सोडून गेले.

प्रेषितांची कृत्ये 19:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला. असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्‍या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले; ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.

प्रेषितांची कृत्ये 19:8-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला. परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला. असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. परमेश्वर पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडवीत होता. त्याने वापरलेले रुमाल किंवा त्याच्या अंगावरचे कपडे रोग्यांकडे आणले तरीदेखील त्यांचे रोग दूर होत व दुष्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत.