YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 19:2-6

प्रेषितांची कृत्ये 19:2-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.” तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.” जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.

प्रेषितांची कृत्ये 19:2-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.” तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले. मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.” हे ऐकल्यानंतर, त्यांचा प्रभू येशूंच्या नावात बाप्तिस्मा करण्यात आला. मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेविले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.

प्रेषितांची कृत्ये 19:2-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” पौलाने म्हटले, “योहान पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्‍यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.” हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला; आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.

प्रेषितांची कृत्ये 19:2-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यांना त्याने विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे, हेच आम्ही कधी ऐकले नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.” पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की, ‘माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.’” हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते अपरिचित भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.