प्रेषितांची कृत्ये 17:32-34
प्रेषितांची कृत्ये 17:32-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही मनुष्यांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला; त्यामध्ये दिओनुस्य अरिय-पगकर, दामारी नावांची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
प्रेषितांची कृत्ये 17:32-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.” त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला. काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास धरला. त्यात दिओनुस्य, नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री, व इतर काहीजण होते.
प्रेषितांची कृत्ये 17:32-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
प्रेषितांची कृत्ये 17:32-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या वेळी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. परंतु इतर काही जण म्हणाले, “ह्याविषयी पुन्हा कधीतरी तुमचे विचार ऐकायला आम्हांला आवडेल.” इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. काही माणसांनी पौलाशी सहमत होऊन त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांत अरीयपगा परिषदेचा सभासद दिओनुस्य, दामारी नावाची स्त्री व इतर काही लोक होते.