प्रेषितांची कृत्ये 17:26-27
प्रेषितांची कृत्ये 17:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही
प्रेषितांची कृत्ये 17:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. यासाठी की, त्यांनी देवाचा शोध या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.
प्रेषितांची कृत्ये 17:26-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी अगोदरच नेमल्या होत्या. परमेश्वराने हे यासाठी केले की, ते त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत.
प्रेषितांची कृत्ये 17:26-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने एका माणसापासून माणसांचे सर्व वंश निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या पाठीवर राहावे, अशी व्यवस्था केली आहे. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे. तरीही तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.