प्रेषितांची कृत्ये 17:10-12
प्रेषितांची कृत्ये 17:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुया शहरास पाठवले, ते तेथे पोहचल्यावर यहूदयांचे सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरूष ह्यांनी विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 17:10-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तेथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले. आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहत असत. याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास धरला, यामध्ये बर्याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते.
प्रेषितांची कृत्ये 17:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. त्यांतील अनेकांनी व बर्याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 17:10-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुया येथे पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदी लोकांच्या प्रार्थनामंदिरात गेले. तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले. ह्यावरून त्यांतील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनी विश्वास ठेवला.