YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 16:22-26

प्रेषितांची कृत्ये 16:22-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.

प्रेषितांची कृत्ये 16:22-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग पौल व सीला यांच्यावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला. त्यांना निष्ठूरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर, तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला. असा हुकूम मिळाल्यावर, त्यांना आतल्या कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यात अडकविण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सार्‍या कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.

प्रेषितांची कृत्ये 16:22-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.

प्रेषितांची कृत्ये 16:22-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तेव्हा लोक त्यांच्यावर खवळले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना चाबकाने मारण्याचा आदेश दिला. पुष्कळ मारहाण केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.