प्रेषितांची कृत्ये 13:24-25
प्रेषितांची कृत्ये 13:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही, तो नंतर येत आहे, त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
प्रेषितांची कृत्ये 13:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला. योहानाचे कार्य संपत आलेले असताना, योहानाने विचारले: ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? तुम्ही ज्याची वाट पाहता तो मी नाही. परंतु जो माझ्यामागून येत आहे, त्याच्या पादत्राणाचे बंद सोडण्याइतकी सुद्धा माझी योग्यता नाही.’
प्रेषितांची कृत्ये 13:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’
प्रेषितांची कृत्ये 13:24-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’