प्रेषितांची कृत्ये 11:19-21
प्रेषितांची कृत्ये 11:19-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली. यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली. प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
प्रेषितांची कृत्ये 11:19-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले. तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली. तेव्हा प्रभूचे सामर्थ्य त्यांच्यावर होते, म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळले.
प्रेषितांची कृत्ये 11:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले.
प्रेषितांची कृत्ये 11:19-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते. परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले. त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते.