2 तीमथ्य 4:19-22
2 तीमथ्य 4:19-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रिस्का, अक्विला व अनेसिफराच्या घरची माणसे ह्यांना सलाम सांग. एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूबूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.
2 तीमथ्य 4:19-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रिस्कीला, अक्विला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांस सलाम सांग. एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता. तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2 तीमथ्य 4:19-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग. एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो. हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.
2 तीमथ्य 4:19-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रिस्का, अक्विला व अनेसिफराच्या घरची माणसे ह्यांना सलाम सांग. एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूबूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.
2 तीमथ्य 4:19-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रिस्का, अक्विला व अनेसिफरच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा सांग. एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात. प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर राहो. तुम्हांला देवाची कृपा मिळो.