YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 4:11-22

2 तीमथ्य 4:11-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

लूक मात्र माझ्याजवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिस शहरास पाठवले आहे. त्रोवस शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये. आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील. त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता. पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले. प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. प्रिस्कीला, अक्विला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांस सलाम सांग. एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता. तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा

2 तीमथ्य 4:11-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे. मीच तुखिकास इफिसास पाठविले माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील, परंतु तू पण त्याच्यापासून सावध राहा; कारण आम्ही जे बोललो, त्या सर्व बोलण्यास त्याने जोरदार विरोध केला. माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये. परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले. प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग. एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो. हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.

सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा

2 तीमथ्य 4:11-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’ त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. प्रिस्का, अक्‍विला व अनेसिफराच्या घरची माणसे ह्यांना सलाम सांग. एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूबूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.

सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा

2 तीमथ्य 4:11-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे. तुखिक ह्याला मी इफिस येथे पाठविले आहे. माझा झगा त्रोवस येथे कार्पजवळ राहिला आहे, तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. तांबट आलेक्सांद्र ह्याने मला पुष्कळ त्रास दिला. त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा; कारण त्याने आपल्या संदेशाला तीव्र विरोध केला होता. माझ्या पहिल्या समर्थनाच्या वेळेस मला कोणीही आधार दिला नाही, तर सर्वांनी मला सोडले होते. त्याबद्दल परमेश्वराने त्यांचा हिशेब घेऊ नये. परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले. सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन. प्रिस्का, अक्विला व अनेसिफरच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा सांग. एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात. प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर राहो. तुम्हांला देवाची कृपा मिळो.

सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा