2 तीमथ्य 4:1-18
2 तीमथ्य 4:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’ त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
2 तीमथ्य 4:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर. मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील. पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे. मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे. आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर. कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे. लूक मात्र माझ्याजवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिस शहरास पाठवले आहे. त्रोवस शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये. आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील. त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता. पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले. प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
2 तीमथ्य 4:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की: तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर. कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील. परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर. कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे. मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल. शक्य तितक्या लवकर माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर, कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत. केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे. मीच तुखिकास इफिसास पाठविले माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील, परंतु तू पण त्याच्यापासून सावध राहा; कारण आम्ही जे बोललो, त्या सर्व बोलण्यास त्याने जोरदार विरोध केला. माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये. परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले. प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
2 तीमथ्य 4:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’ त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
2 तीमथ्य 4:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की, शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे. लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील, ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल. परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड. आता मी स्वतःचे बलिदान म्हणून अर्पण करावे, अशी वेळ येत आहे, माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, ऐहिक सुख प्रिय मानून देमास मला सोडून थेस्सलनीकाला गेला. क्रेस्केस गलतीयाला निघून गेला व तीत दालमतियाला गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे. तुखिक ह्याला मी इफिस येथे पाठविले आहे. माझा झगा त्रोवस येथे कार्पजवळ राहिला आहे, तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. तांबट आलेक्सांद्र ह्याने मला पुष्कळ त्रास दिला. त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा; कारण त्याने आपल्या संदेशाला तीव्र विरोध केला होता. माझ्या पहिल्या समर्थनाच्या वेळेस मला कोणीही आधार दिला नाही, तर सर्वांनी मला सोडले होते. त्याबद्दल परमेश्वराने त्यांचा हिशेब घेऊ नये. परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले. सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन.