2 तीमथ्य 2:3-7
2 तीमथ्य 2:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल.
2 तीमथ्य 2:3-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे. एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. परिश्रम करणार्या शेतकर्याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे. जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो.
2 तीमथ्य 2:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. श्रम करणार्या शेतकर्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल.
2 तीमथ्य 2:3-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो.