2 तीमथ्य 2:22-25
2 तीमथ्य 2:22-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग. परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
2 तीमथ्य 2:22-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग. परंतु मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादात गुंतला जाऊ नकोस, कारण त्याद्वारे भांडणे होतात हे तुला ठाऊक आहे. प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. विरोध करणार्यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल.
2 तीमथ्य 2:22-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यांपासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणार्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल
2 तीमथ्य 2:22-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध अंत:करणाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर यथोचित संबंध, विश्वास, प्रीती व शांती ह्यांचा पाठपुरावा कर. मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना नम्रतेने शिक्षण देणारा, असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल