2 थेस्सल 3:3-5
2 थेस्सल 3:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
2 थेस्सल 3:3-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु प्रभू विश्वासू आहे, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि त्या दुष्टापासून तुमचे रक्षण करतील, आणि आम्हाला प्रभुमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल. प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
2 थेस्सल 3:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हांला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील. तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
2 थेस्सल 3:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु प्रभू विश्वसनीय आहे. तो तुम्हांला मजबूत करील व त्या दुष्टापासून तुमचे संरक्षण करील. तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल. देवाच्या प्रीतीची व ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या सहनशीलतेची प्रभू तुम्हांला अधिक प्रगल्भ समज देवो.