2 थेस्सल 2:7-8
2 थेस्सल 2:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील; मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील
2 थेस्सल 2:7-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अनीतिचे गुप्त सामर्थ्य अगोदरच कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. मग हा नियम नसलेला पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील.
2 थेस्सल 2:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.
2 थेस्सल 2:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.